लाइट्स, कॅमेरा आणि जातवास्तव : स्वातंत्र्यानंतर ३८ वर्षांनी डॉ. आंबेडकरांच्या प्रतिमेला हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्थान मिळालं!
राष्ट्रव्यापी नागरिकता विरोधी कायद्याचे आंदोलन ज्या वेळी सुरू होते, त्या वेळी अनेक पोस्टर्स, छायाचित्रं आणि डॉ. आंबेडकरांची पुस्तकं अनेक तरुणांच्या हातामध्ये होती, हे आपण बघितलंच आहे. गांधीवादी इतिहासकार रामचंद्र गुहा यांना जेव्हा बेंगळुरात टाऊन हॉलच्या बाहेर अटक झाली, तेव्हा त्यांच्याही हातात आंबेडकरांची प्रतिमा होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर दिग्दर्शक पा. रंजित यांनी केलेल्या विधानाला फार महत्त्व आहे........